English मराठी
  • योजनेचे नाव: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
योजनेचा उद्देश
शेती व्यवसाय करतांना शेतकऱ्यांना काही अपघात झाल्यास त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला विम्याचे संरक्षण देणे.
पात्रतेचा तपशील
  • मुख्य व्यवसाय हा शेती असावा.
  • स्वत: ची शेतजमीन असावी
  • वय हे १० ते ७५ दरम्यान असावे.
लाभाचा तपशील
शेती व्यवसाय करतांना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे इ. नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात यामुळे शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास अथवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास निर्माण होणाऱ्या अडचणीच्या परिस्थितीत शेतकऱ्याच्या कुटुंबाला विमा संरक्षण मिळते. तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील एक सदस्य याचा लाभ घेऊ शकतो.
  • अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपघातामुळे 2 डोळे अथवा 2 अवयव निकामी झाल्यास रु. 2 लाख विमा संरक्षण
  • अपघातामुळे 1 डोळा अथवा 1 अवयव निकामी झाल्यास रु. 1 लाखाचे विमा संरक्षण
  • आवश्यक कागदपत्रे
  • ७/१२ उतारा
  • वयाचा दाखला
  • प्रथम माहिती अहवाल
  • मृत्यू दाखला
  • घटनास्थळ पंचनामा
  • विजेचा धक्का अपघात, वीज पडून मृत्यू, पाण्यामध्ये बुडून मृत्यू, उंचीवरून पडून झालेला मृत्यू, सर्पदंश/ विंचूदंश व अन्य कोणतेही अपघात यासाठी प्रथम माहिती अहवाल किंवा पोलीस पाटील अहवाल
  • संपर्क
    संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालय व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय. मुख्य सांख्यिक, कृषि आयुक्तालय, पुणे. फो.नं. 020/26121041 शासनस्तरावरील संपर्क - अवर सचिव (11-अे), कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई-32.
    ऑनलाईन अर्जाकरिता लिंक
    उपलब्ध नाही