शेती व्यवसाय करतांना शेतकऱ्यांना काही अपघात झाल्यास त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला विम्याचे संरक्षण देणे.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
SCHEME OBJECTIVE
ELIGIBILITY DETAILS
- मुख्य व्यवसाय हा शेती असावा.
- स्वत: ची शेतजमीन असावी
- वय हे १० ते ७५ दरम्यान असावे.
BENEFIT DETAILS
शेती व्यवसाय करतांना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे इ. नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात यामुळे शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास अथवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास निर्माण होणाऱ्या अडचणीच्या परिस्थितीत शेतकऱ्याच्या कुटुंबाला विमा संरक्षण मिळते. तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील एक सदस्य याचा लाभ घेऊ शकतो.
अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपघातामुळे 2 डोळे अथवा 2 अवयव निकामी झाल्यास रु. 2 लाख विमा संरक्षण
अपघातामुळे 1 डोळा अथवा 1 अवयव निकामी झाल्यास रु. 1 लाखाचे विमा संरक्षण
REQUIRED DOCUMENTS
CONTACT
संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालय व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय.
मुख्य सांख्यिक, कृषि आयुक्तालय, पुणे. फो.नं. 020/26121041
शासनस्तरावरील संपर्क - अवर सचिव (11-अे), कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई-32.
ONLINE APPLICATION LINK
उपलब्ध नाही