लाभाचा तपशील
अ) पीडीतास मंजूर करण्यात आलेल्या एकूण रक्कमेपैकी सुरुवातीस तातडीची मदत म्हणून मंजूर करण्यात आलेली रु.30 हजार इतकी रक्कम वजा करुन उर्वरित 25% रक्कम पिडीतास अथवा पिडीताच्या नातेवाईकास रोखीने अदा करण्यात येईल. त्यानंतर उर्वरित 75% रक्कम पिडीताच्या नावे पिडीत किंवा त्याच्या अल्पवयीन वारसाच्या नावे १० वर्षासाठी (पिडीत बालक असेल तर वयाच्या १८ वर्षापर्यंत) जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्यामार्फत बँकेत मुदतठेव म्हणून ठेवण्यात येईल
१) बलात्कार विषयक घटनांमध्ये:
बलात्काराच्या घटनेच्या परिणाम स्वरूप मानसिक धक्का बसून महिलेस कायमचे मतिमंदत्व/ अपंगत्व आल्यास अथवा सामूहिक बलात्कार प्रकरणी महिलेस गंभीर व तीव्र स्वरूपाची शारीरिक इजा झाल्यास- - रु. १० लाख पर्यंत
भूलथापा, फसवणूक, लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार झाला असेल तर – रु. १ लाख पर्यंत
कौटुंबिक हिंसाचार अधिनियम- २००५ नुसार न्यायालयात/ फारकत / घटस्फोट झाल्यानंतर पतीकडून महिलेच्या बाबतीत बलात्काराची घटना घडल्यास- रु. १ लाखापर्यंत
बलात्काराच्या घटनेमुळे महिलेचा मृत्यू झाल्यास ती महिला कमावत्या कुटुंबातील नसल्यास रु. १ लाखापर्यंत आणि असल्यास रु. २ लाखापर्यंत.
२) पॉक्सो अंतर्गत बालकांवर लैंगिक अत्याचार विषयक घटनांमध्ये:
• घटनेमध्ये पीडित बालकास / अल्पवयीन मुलीस मानसिक धक्का बसून कायमचे मतिमंदत्व/ अपंगत्व आल्यास अथवा गंभीर व तीव्र स्वरूपाची शारीरिक इजा झाल्यास- - रु. १० लाख पर्यंत
• भूलथापा, फसवणूक, लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीच्या बलात्कार प्रकरणात – रु. १ लाख पर्यंत.
३) ॲसिड हल्ला:
• घटनेमध्ये पीडित महिला / बालकाचा चेहरा विद्रूप झाल्यास, शरीराच्या दृश्य भागाची हानी झाल्यास, कायमचे अपंगत्व आल्यास- रु. १० लाखापर्यंत
• ॲसिड हल्ल्यात जखमी झाल्यास- रु. ३ लाखापर्यंत
ब) बलात्काराच्या घटनेमुळे गंभीर इजा / आजार अथवा HIV लागण झाली असेल तर त्यासाठी संबंधितास शासकीय रुग्णालयातून मोफत उपचार दिले जातील.
क) ॲसिड हल्ल्यात चेहरा विद्रूप झाल्यास करावयाच्या प्लास्टिक सर्जरी शासनाने निश्चित केलेल्या रुग्णालयात शासनाच्या खर्चाने होईल.
ड) याशिवाय सदर पिडीत महिलेस वैद्यकीय आधार देण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या प्रशिक्षित टीम मार्फत समुपदेशन / कायदेशीर इ. सेवा विनामूल्य पुरवण्यात येतील.
इ) तसेच सदर पिडीत महिलेस नोकरी / व्यावसायिक प्रशिक्षण देवून तिचे पुनर्वसन करण्यात येईल.
ऑनलाईन अर्जासाठी लिंक
उपलब्ध नाही