English मराठी
  • योजनेचे नाव: राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना
योजनेचा उद्देश
शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना अपघाती विम्याचे संरक्षण देणे
पात्रतेचा तपशील
  • विद्यार्थी १ ली ते १२ वी मध्ये शिकणारा असावा.
लाभाचा तपशील
खालीलप्रमाणे सानुग्रह अनुदान मिळेल.
  • अपघाती मृत्यू झाल्यास रु. ७५ हजार
  • अपघातामुळे कायमचे अपंगत्व (२ अवयव / २ डोळे किंवा 1 अवयव / १ डोळा निकामी )झाल्यास रु. ५० हजार
  • अपघातामुळे कायमचे अपंगत्व (१ अवयव किंवा १ डोळा कायम निकामी )झाल्यास रु. ५० हजार
  • आवश्यक कागदपत्रे
    अपघाती मृत्यू झाला असेल तर
  • प्रथम खबरी अहवाल (FIR)
  • स्थळ पंचनामा
  • इंक्वेस्ट पंचनामा
  • सिव्हील सर्ज यांनी प्रती स्वाक्षरीत केलेले मयत विद्यार्थ्याच्या बाबतीत शवविच्छेदन अहवाल
  • मृत्यू दाखला (सिव्हील सर्जन यांनी प्रति स्वाक्षरीत केलेले)

  • अपंगत्व आल्यास
  • अपंगत्वाच्या कारणाबाबतचे डॉक्टरांचे अंतिम प्रमाणपत्र सिव्हील सर्जन यांच्या प्रति स्वाक्षरीसह (कायम अपंगत्वाचे प्रमाणपत्र)
  • संपर्क
    संबंधित शाळांचे मुख्याध्यापक / गट शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक) / शिक्षण निरीक्षक
    ऑनलाईन अर्जाकरिता लिंक
    उपलब्ध नाही