English मराठी
  • योजनेचे नाव: पीकांवरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप)
योजनेचा उद्देश
  • पीकांवरील कीड/रोगांचे शास्त्रोक्त सर्वेक्षण करणे व व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना मोफत सल्ला देणे,
  • शेतकऱ्यांमध्ये कीड रोगाबाबत जागरुकता निर्माण करणे
  • आपत्कालीन परिस्थितीत शेतकऱ्यांना किटकनाशकांचा पुरवठा करणे.
पात्रतेचा तपशील
  • स्वत: ची शेतजमीन असावी.
  • सोयाबीन, कापूस, भात,मका, ऊस, ज्वारी , तूर व हरभरा यांपैकी कुठलेही एक पीक शेतामध्ये असावे.
  • m-Kisan portal वर नोंदणी केलेली असावी.
  • आंबा, केळ, संत्रा, लिंबूवर्गीय फळे, चिकू या फळपिकांसाठी शेतकरी पुढीलपैकी कोणत्याही एका जिल्ह्यामध्ये राहणारा असावा. जिल्हे पुढीलप्रमाणे - पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, पुणे, अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, अकोला, अमरावती , वर्धा, नागपूर
  • लाभाचा तपशील
  • सोयाबीन, कापूस, भात,मका, ऊस, ज्वारी , तूर व हरभरा पिकांवरील कीड/रोगांच्या व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना एस.एम.एस.द्वारे शास्त्रोक्त व मोफत सल्ला देण्यात येईल
  • आंबा, डाळिंब, केळी, संत्रा, मोसंबी व चिक्कू या पिकांना किडीपासून वाचविण्यासाठी फायदा होऊ शकेल. जसे की, कीड नियंत्रणासाठी काय करावे याचे माहिती तंत्रज्ञान हे प्रशिक्षणाद्वारे मिळेल.
  • आपत्कालीन परिस्थितीत जिल्ह्यास उपलब्ध कार्यक्रमानुसार ५० टक्के अनुदानावर (रु.७५०/- प्रति हेक्टर मर्यादेत) तालुकास्तरावरून किटकनाशकांचा पुरवठा करण्यात येईल.
  • कीड रोग व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षण तसेच या अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या गाव बैठकातून मार्गदर्शन मिळेल.
  • आवश्यक कागदपत्रे
  • ७/१२ उतारा
  • नमुना ८ अ
  • संपर्क
    संबंधित जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी/उपविभागीय कृषि अधिकारी/ तालुका कृषि अधिकारी/मंडळ कृषि अधिकारी संपर्क अधिकारी व राज्य व केद्र यांचे नाव व संपर्क आयुक्तालय स्तर –
  • श्री. सुभाष घाडगे, कृषि उपसंचालक (पीक संरक्षण), फोन: 020-25513242
  • श्री. एम. एस. घोलप, कृषि सहसंचालक, विस्तार व प्रशिक्षण-3, फोन: 020-25512815
  • ऑनलाईन अर्जाकरिता लिंक